शेतक-यांच्या नावावर निवडूण आलेले महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी : राजू शेट्टी

शिर्डी :- शेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकीचे असून नविन नेतृत्व तयारच होवून द्यायचे नाही, ही राज्य सरकारमधील लोकांची मानसिकता आहे. आपलीच पारंपरिक घराणी सत्तेत राहिली पाहीजे यासाठी हा निर्णय असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली

बैठक! शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, अजित पवारही हजर

आज शिर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीसह जिल्हास्तरीय नवीन कार्यकारिणीची निवड पार पडली त्यावेळी ते बोलत होते. घराणेशाहीचे समर्थन करणारे हे सरकार असून तुमचे घराणे अगोदरच आमच्या बोकांडी बसले आहेत, किमान गावातले तरी संपवू द्या, अशी टीका थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करण्यावर राजू शेट्टी यांनी केली.
राज्यात अनेक ठिकाणी अती दुर्गम भागात शाळा आहेत, पटसंख्येच्या नावाखाली राज्य सरकार शाळा बंद करायला निघाले आहे. वाड्या-वस्त्यांवरच्या शाळा बंद झाल्या तर मुलांना पायपीट करावी लागणार असून गुलामांना जन्म घालणारी ही व्यवस्था आहे का? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला.

कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे सांगताना शेट्टी म्हणाले, हे सरकार नेमकं कुणासाठी काम करत आहे? असा सवालली राजू शेट्टींनी उपस्थित केला. तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यानी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी ला स्वाभिमानीचा विरोधच असून मुळ मुद्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेणे अयोग्य असून केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून हे सरकार काय शेतकऱ्यांचे सरकार आहे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला.