… पण सरकार स्थिर ; शरद पवार-उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा

sharad pawar-uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील वातावरण तापले आहे . महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेने दिली तर हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा:- हे शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार आहे; सत्तेचा गोवर्धन तसूभर हलणार नाही – अनिल गोटे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र शरद पवार यांनी स्वत: सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

राज्यातील सरकार मजबूत आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व ताकद पणाला लावली आहे. ठाकरे यांच्याबरोबरच्या चर्चेत राजकारण हा विषय नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी व इतर गप्पा झाल्या. मी राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतणार, या बातम्या पोरकट असल्याचे पवार म्हणाले . तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. सरकार स्थिर आहे, असे वक्तव्य केले . हे संपूर्ण चित्र पाहता शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावध पवित्रा घेतल्याचे दिसते .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER