महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे नाही, १५ वर्षे टिकेल – सुप्रिया सुळे

Supriya Sule-Mahavikas Aghadi

धुळे : राज्यात भाजपाशी युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाला सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. मात्र विरोधकांकडून सतत सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. सुळे या शुक्रवारी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या हितासाठी चांगल्या प्रकारे काम करत असून हे सरकार पाच वर्षे नाही, १५ वर्षे टिकेल. मात्र, आमच्या सरकारबाबत माध्यमांद्वारे समज-गैरसमज पसरवले जात आहेत.

याबाबत आम्ही कोणतीही चिंता करत नाही.” असा विश्वास सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, दिल्ली येथे झालेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेला गृह मंत्रालय जबाबदार असून गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळेंनी रक्षा खडसेंचे कौतुक केल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात…