वीजबिलावरून महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट

Balasaheb Thorat & Ashok Chavhan

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस राज्यात भुईसपाट झाली. त्यानंतर शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या हट्टाकातर राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असत्तित्वात आले. शिवसेनेच्या हट्टात पुर्णपणे गळालेल्या कॉंग्रेसला थेट सत्तेची गोडी चाखता आली. आता या महाविकास आघाडीला एक वर्ष पुर्ण झाले आहे. त्यातच महाराष्ट्र कॉंग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणेवरून राज्यात रान पेटलं आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha Vikas Aaghadi Sarkar) सरकारला घेरलं आहे. अशातचं महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.

नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी दिली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अशोक चव्हाण यांचे कान टोचले आहे.

नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ही मंत्रिमंडळ सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. वीजबिल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री निती राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण यांनी काल ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलाताना नितीन राऊत यांनी वीज बिल सवलतीची घोषणा करण्याआधी मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा समवेत करायला हवी होती. त्यानंतर घोषणा होणे गरजेचे होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून थोरात यांनी आता चव्हाण यांनाच फटकारलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER