
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. सामान्य लोक, किरकोळ व्यापारी लॉकडाऊनमुळे चिंतेत आहेत. मात्र, राज्याच्या राजकीय वर्तुळात काही वेगळेच चालले आहे. कोरोनाच्या संकटात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काल खूद्द शरद पवार राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन आले. त्यानंतर क्वचितच मातोश्रीवर जाणारे पवार काल संध्याकाळी मातोश्रीवरदेखील जाऊन आलेत.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थिर व मजबूत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाला दिली.
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकार चांगले काम करत असल्याचेही मलिक म्हणाले. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर ते म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांसाठी मुंबईत मोठी तयारी केली जात आहे. कोविड दवाखाने ऊभारले जात आहे. त्यापैकी काही दवाखाने तयारदेखील झाले आहेत. कोरोनाची स्थिती महाराष्ट्र हाताळू शकत नाहीत असे विरोधक लोकांच्या मनांवर मुद्दाम बिंबवत आहेत. असेही मलिक म्हणाले. विरोधक राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला