महाविकास आघाडी सरकार केवळ पाच वर्षे नाही तर पुढेही आम्ही एकत्र राहून सेवा करत राहू : आदित्य ठाकरे

मुंबई :- महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi govt) पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येते. विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये राज्य सरकार टिकणार नाही, अशी टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे .

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? असा प्रश्न आदित्य यांना एबीपी न्यूजने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली ही चांगली गोष्ट असल्याचे आदित्य यांनी म्हटले. हे तीन पक्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले आहेत, असंही आदित्य म्हणाले. महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये वाद असल्याचे दावे केले जात असल्यासंदर्भात बोलताना, “तुम्ही ज्याला वाद म्हणत आहात तो मला वाद वाटत नाही.

तीन पक्षांचं सरकार आहे तर चर्चा होत राहतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्लेषण करून काम केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता येते. असं झाल्यास केवळ पाच वर्षे नाही तर पुढेही आम्ही एकत्र राहून सेवा करत राहू, असे आदित्य म्हणाले. महाराष्ट्र सरकारला अनेक चेहरे असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. विरोधी पक्षाला अशा टीकेवर उत्तर देण्याऐवजी आम्ही काम करत राहणं जास्त योग्य ठरलं. मुख्यमंत्री आधी सर्वांचा सल्ला घेतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांविरोधा सुरू असणाऱ्या चौकशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सध्या तपास सुरू असल्याने काही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. प्रकरण न्यायाप्रविष्ट असल्याने काही भाष्य करणं अयोग्य ठरेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button