महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला ; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Chandrakant Patil

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाने ५ मे रोजी हा निकाल दिला. आता केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले .

मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपाने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. आज या समितीची पहिली बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केले आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवले होते आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली, अशी टीका चंद्रकात पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button