मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारची धूळफेक; आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar

नांदेड :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने हाताने घालवलेले मराठा आरक्षण (Maratha Reservation) तसेच त्यांच्याकडून समाजाच्या डोळ्यात केली जाणारी धूळफेक याच मुद्यांवरून आगामी अधिवेशनात नांदेडमधील ऊर्जा घेऊन सरकारला धक्का देऊ, असा इशारा भाजपाचे माजी मंत्री आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांंनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, डॉ. संतुक हंबर्डे व इतर उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) निष्क्रिय कारभारामुळे तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. योग्य पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे नेते या बाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवून समाजाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या चुका सर्वसामान्यांना निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी भाजपा प्रदेश कार्यालयाने काही नेत्यांकडे सोपविली आहे. नांदेड व बीड जिल्ह्यची जबाबदारी माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे आहे. शुक्रवारी शेलार यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रमुख नेत्यांसमवेत शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाबाबत भोसले समितीकडून मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button