पैसे कमवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार, भाजप खासदाराची टीका

Ranjit Naik Nimbalkar - Maharastra Today

सातारा : महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे सरकार हे पैसे कमविण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहे. भारतातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका माढा लोकसभेचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कोरोनामुळे लोकांकडे पैसे नसताना सरकारने वीजबील भरण्याचा तगादा जनतेकडे लावला आहे. वीजबिल भरत नाही म्हणून वीज कनेक्शन तोडले जात आहेत. ही शरमेची गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे लवकरच अंतर्गत कुरघोड्यांमुळे हे सरकार पायउतार होईल, अशी खरमरीत टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button