नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व, भाजपची पीछेहाट

Uddhav Thackeray - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वांत जास्त जागा जिंकून आपले वर्चस्व स्थापित केले आहे. २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत सत्ताधारी भाजपला केवळ चारच जागा मिळवण्यात यश प्राप्त झाले.

समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी मनापासून आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. जिल्हा बॅंकेची आजची आर्थिक परिस्थिती काय आहे, ते उघड आहे. मागील काही वर्षांत एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे.

ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button