जळगावात महाविकास आघाडीत मतभेद चव्हाटयावर ; ग्रामपंचायतीत काँग्रेस स्वबळावर

Mahavikas Aghadi

जळगाव :- भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगाव जिल्ह्यातच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मतभेद चव्हाटयावर आले आहेत .

जळगावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Jalgaon-gram-panchayat-election) काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे.

राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER