सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवरही महाविकास आघाडी

Siddhivinayak mandir trust

मुंबई :- देशभरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवरही (Siddhivinayak mandir trust) आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पोहचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय पदांवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची‌ वर्णी लागली आहे.

काँग्रेसचे राजाराम देशमुख यांचा सिद्धिविनायक ट्रस्ट सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर, सिद्धिविनायक ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाला तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

२४ जुलै २०२० पासूनच तीन वर्षांसाठी बांदेकरांची पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचं राज्य सरकारनं सांगितलं होतं. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जादेखील देण्यात आला आहे.

साडेतीन वर्षांपूर्वी (जुलै २०१७) आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांची श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. २०१८ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER