‘या’ कारणाने राज्यपालांसोबत ठरलेली भेट झाली रद्द!

मुंबई :- विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. यात त्यांनी राज्यातील घडामोडींची सविस्तर माहीती राष्ट्रपतींना द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नेते आज राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना भेटून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींसंदर्भात बाजू मांडणार होते. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने भेट रद्द झाली.

आज आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते, अशी माहीती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. मात्र, राज्यपाल २८ मार्चपर्यंत देहरादून येथे असणार आहेत. राज्यपाल हे दौऱ्यावर असले तरी यात अनेक उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची काल भेट घेतली. तासभर भाजप नेते आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रपती राजवट या विषयावर मुख्यमंत्री काही बोलत नसतील, तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहीजे. तसेच राज्यपालांनी राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडून अहवालही घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते.

दरम्यान, अँटिलिया बाहेरचे स्फोटकेप्रकरण, सचिन वाझेप्रकरण, मनसुख हिरेन हत्याप्रकरण, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेप्रकरण या सर्व घडामोडींनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर मविआ सरकारमधील नेते आज राज्यपालांना भेटून त्यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या सत्यतेची माहीती त्यांना देणार होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी वाट पाहावे लागणार आहे. मात्र, यावरून पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी पण वाचा :  …तर फडणवीस यांचीही चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER