शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- गेल्या ११ दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची  (Bharat Bandh) हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांची भूमिका ही दुटप्पी असल्याचा पलटवार केला आहे. केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते कायदे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लागू आहेत. केवळ मोदी सरकारला विरोध करण्यासाठी राजकीय पक्ष भारत बंदला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या आधी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत त्या पक्षांनी या कायद्यांना समर्थन दिल्याचे सांगितले. या पक्षांची भूमिका ही दुटप्पी असल्याचेही ते म्हणाले. ज्या कायद्यांच्या संदर्भात आंदोलन सुरू  आहे, ते कायदे राज्यात २००६ मध्ये करण्यात आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना हे कायदे करण्यात आले, खासगी एपीएमसी स्थापन करण्यात आल्या. मला आश्चर्य वाटतं की, राज्यात ज्या गोष्टी झाल्या त्या केंद्राने केल्या तर यांना आक्षेप आहे, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : भाजपा खोट्या पद्धतीने शरद पवारांचे पत्र फिरवत आहे; राष्ट्रवादीने केला आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER