
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा “भारतरत्न” पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रात देण्यात आले आहे.
ही बातमी पण वाचा:- पाच वर्षाचा मुलगाही सांगतो सरकार महायुतीचं येणार – देवेंद्र फडणवीस
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रकाशित करण्यात आले.
संकल्पपत्रात दुष्काळमुक्त महाराष्ट्र, निसर्गावर अवलंबून असणारी शेती शाश्वत शेती व्यवस्थेकडेनेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, मराठवाड्याच पाणी मराठवढ्याला देणं, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, इथे पुढच्या ५ वर्षात पाणी पोहोचवणे, ५ वर्षात १ करोड रोजगार निर्मिती असे संकल्प आहेत.