महात्मा गांधी हिंदुत्ववादी होते : शरद पोंक्षे

Gandhi-and-Sharad

मुंबई : महात्मा गांधी हेदेखील हिंदुत्त्ववादीच होते, त्यांनी रामाची भजनंच म्हटली कव्वाली नाही, असे २५ वर्षे नथुराम गोडसे ही भूमिका साकारणा-या अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात पोंक्षे बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या आठवणीही सांगितल्या.

“मी सावरकरांना मानणारा, त्यांचा विचार मानणारा माणूस आहे, असे असले तरीही महात्मा गांधींबाबत माझ्या मनात आदर आहे” असेही शरद पोंक्षे यांनी सांगितले. एवढंच नाही तर कर्करोग, कर्करोगाशी दिलेला लढा, माझी जन्मठेप या सावरकरांच्या पुस्तकातून मिळालेली प्रेरणा याबाबतही शरद पोंक्षे भरभरुन बोलले.

हिमालयाची सावली हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. मराठी सिनेनाट्य सृष्टीतील दिग्गज अभिनेते ही शरद पोंक्षे यांची ओळख आहे. त्यांचेकर्करोग झालेला असताना आणि त्यावर उपचार सुरु असतानाच आपल्याला हे नाटक कसे मिळाले हेदेखील शरद पोंक्षे यांनी सांगितले. कर्करोगाला कसे पळवून लावावे, आपली पॉझिटीव्ह एनर्जी कशी बाळगा हेदेखील त्यांनी सांगितले. या सगळ्या दरम्यान जेव्हा शरद पोंक्षे यांना गांधीजींबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा महात्मा गांधी हेदेखील हिंदुत्त्वावादीच होते त्यांनी रामाची भजने म्हटली कधीही कव्वाली म्हटली नाही असे पोंक्षे म्हणाले.