महात्मा गांधींना सुभाष बाबूंना कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचा दिला होता सल्ला!

Maharashtra Today

साधी जीवनशैली आणि दृढ निश्चयी स्वभावामुळं गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. गांधींनी(Mahatma Gandhi ) भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अहिंसेच रुप दिलं. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर संपूर्ण देशानं वाटचाल केली. अहिंसा, नैतिकता आणि उपोषणाच्या माध्यामातून स्वतंत्रता आंदोलन त्यांनी यशस्वी करुन दाखवलं.

भारतातल्या खुप कमी जणांना माहिती असेल की गांधींनी १७ वेळा भारतीय स्वातंत्र लढात उपोषण केलं होतं. त्यांच सर्वात मोठं उपोषण २१ दिवस चाललं. मजदूरांचा प्रश्न असो की हिंदू मुस्लीम एकता. गांधींनी सत्य आणि अहिंसा हेच जीवनभर आपलं अयुध मानलं. असे अनेक इतिहासकार आहेत, ज्यांनी गांधीच्या स्वातंत्र्य संग्रामाचं कौतूक केलंय, पण काही इतिहासकारांनी गांधींच्या खानपाणाच्या सवयीवरही प्रकाश टाकला. आहाराच्या सवयीवर गांधीजी म्हणाले होते. “आहार आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतो. इतर काम जितकी महत्त्वाची असतात तितकेच महत्त्व मी आहाराला देतो.”

गांधीच्या आहार सवयीवर टाकलेली ही एक नजर

वैष्णव परिवारात जन्मलेल्या गांधींच्या परिवारात मांसाहार आधीपासूनच घेतला जात नव्हता. लहानपणी विद्रोह म्हणून गांधींनी काहीवेळा मासांहार केला होता. नंतर गांधींना याचा पश्चाताप झाला. नंतर त्यांनी पुर्णपणे मांसाहार बंद केला. कायदा शिकण्यासाठी लंडनाला जाईपर्यंत गांधीजी परंपरेने शाकाहारीहो होते. रामचंद्र गुहा यांनी ‘इंडिया बिफोर गांधी’ या पुस्तकामध्ये लिहलंय की ‘हेनरी साल्ट’ यांच्या ‘प्ली फॉर साल्ट’ या पुस्तकामुळं गांधींना स्वेच्छा शाकाहारी बनायला मदत झाली.

लंडनमध्ये गांधींसोबत राहणारे जोसिया ओल्डफिल्ड यानं गांधींसोबत ‘लंडन व्हेजीटेरियन सोसायटी’ शोधून काढली. तिथं पोहचल्यावर त्यांना समजलं की भारतानं संपूर्ण जगाला शाकाहाराकडे वळण्याचा संदेश दिलाय. अनेक इंग्रजी सैन्यअधिकाऱ्यांना बिअर आणि बिफ शिवाय युद्धभूमिवर टिकता येत नाही . दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिक डाळभात खाऊन अनेक दिवस शत्रुशी टक्कर घ्यायचे.

गांधी आणि जोसियांनी मिळून ५२ सेंट स्टीफन गार्डन, बायसवाटर होम सारख्या अनेक दावती दिल्या. यात पाहूण्यांना फक्त डाळभात आणि काजू वाढण्यात आला होता. गांधींनी आहारावर अनेक पुस्तकं लिहली. ‘डाएट अँड डाएट रिफॉर्म्स,’ ‘द मॉरल बेसिस ऑफ वेडिटेरियनिज्म’ आणि ‘की टु हेल्थ’ अशी प्रमुख पुस्तकं होती.

शाकाहारी गांधींनी पुढं जाऊन जेवणात मसाला वापरणंही बंद केलं. उकडलेल्या भाजांना त्यांनी आहारात सामील केलं. डेअरी व्यवसायात जनावरांशी होणारा दुध व्यवसाय सोडून त्यांनी बकरीचं दुध प्यायला सुरुवात केलीय. साबरमती आश्रमात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या नियमाचा अवलंब करणं कठिण होतं. गांधींनी कोणत्या दिवशी काय बनेल याची यादीच आश्रमातील महिला सदस्यांना दिली होती.

गांधींचा दुसरा मुलगा मनीलाल यांची पत्नी सुशीला साबरमती आश्रमात जेवण बनवायच्या. त्यांनी नात, उमा धुपेलिया मिस्त्री यांनी मनीलाल यांची आत्मकथा लिहली. यात उमा लिहतात, “मला आजही ते जेवण आठवतं. उकळलेल्या भाज्या, दही, तुप, लोणी असं जेवण आम्ही औषधासारखं खायचो.”

सुशाली यांची सर्वात लहान मुलगी ईला जेव्हा पाच वर्षांची होती. तेव्हा त्या गांधींना म्हणाल्या होत्या आश्रमाचं नाव बदलून ‘कोलग्राम’ ठेवायला हवं. तिथलं बेचव जेवण त्यांना पटलं नव्हतं. नंतरच्या काळात गांधींच्या स्वयंपाक घरातील अनेक किस्से समोर आले. सेवग्राममध्ये एकच स्वयंपाक घर होतं. गांधीजी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तिथच जेवायचे; पण कस्तूरबांचं एक वेगळ स्वयंपाक घर होतं तिथं त्या नाती- नातवांसाठी मिठाई बनवायच्या.

गांधी अनेक अनुयायांना खानपाणाच्या संबंधी सल्ला द्यायचे. प्रमोद कुमार यांनी ‘गांधी इल्ल्लूस्ट्रेटर बायोग्राफी’ या पुस्तकात तिनशे चित्रांच्या माध्यमातून गांधींचं जीवनचरित्र जगासमोर आणलं. यात एक फोटो आहे. १९३६ साली गांधींकडून सुभाष बाबूंनी (Subhash Babu) आहार तालिका बनवून घेतली. गांधींनी सुभाषचंद्र बोसांना कांदा आणि लसून खायला सांगितलं. कच्च्या स्वरुपात ही दोन पदार्थ खाण्याचा सल्ला दिला होता. यामुळं क्षय रोगांसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण होतं.

गांधींनी आहार विषयक विचार नेहमी सहज ठेवले. “तुम्ही तेच बनता जे तुम्ही खाता.” यातून अनेक भारतीयांनी प्रेरणा घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button