हर हर महादेव ! मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भक्तांचा सागर

मुंबई : शिवाची स्वयंभू मूर्ती असलेल्या मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ शिवमंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तगण भगवान शंकराच्या पूजेसाठी जमलेले आहेत. देशभरातून भक्तगण आले आहेत. सकाळपासून हजारोंनी पूजा केली असून, दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविक अभिषेक आणि पूजा करतात. ‘हर हर महादेव’च्या घोषात भक्तांनी आज दर्शन घेतले. गिरगाव चौपाटीजवळील एका टेकडीवर हे मंदिर आहे.

महाशिवरात्री विशेष : विठुमाऊलीच्या मंदिरात तब्बल १०० किलो बेलाच्या पानांची आरास

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर १२व्या शतकात बांधले, अशी माहिती बाबुलनाथ ट्रस्टचे मुख्य पुजारी लालबहादूर यांनी दिली. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते, मात्र, १७८०साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला, अशी माहितीही लालबहादूर यांनी दिली.