पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, तीन महिन्यात सरकार कोसळेल; मुनगंटीवारांचा दावा

Sudhir Mungantiwar-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यात कोसळेल. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक ठरणार आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, असेही मुनगंटीवार म्हणाले. ते आज नागपुरात बोलत होते.

राज्यात शुभकार्य कधी ना कधी होणारच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात 116 तास 39 मिनिटे अधिवेशन झालं. यावेळी 47 तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर (West Bengal) महाराष्ट्राचा(Maharashtra) नंबर आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

सभागृहात प्रश्न उपस्थित केला की मोहन डेलकर आत्महत्या सांगायचे.  आत्मनिर्भर, शक्तीमान, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी अनेक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नाही.

कोणालाही असं सरकार टिकवणं तेही राजकीय दृष्टीने सर्वात मोठी घोडचूक ठरेल, असा दावाही मुनगंटीवारांनी केली.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीकडून भाजपला धक्का, नागपुरातील बड्या नेत्यासह पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER