महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर ‘मिशन बिगिन अगेन’मध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करू द्या. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला काढून नक्की बोलणार, असेही ठाकरे म्हणाले . सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला .

त्यावेळी ते बोलत होते . राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे .हे वर्षच कोरोना काळात गेले असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सुरुवातीला सर्व धर्मीयांचे आभार मानतो. सणासुदीचे दिवस असूनही सगळ्या धर्मातील लोकांनी संयम पाळून आपण सगळ्यांनी कोरोना काळात सहकार्य केले त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देतो. पुनश्च हरिओम अर्थात ‘मिशन बिगिन अगेन’ला पुन्हा सुरुवात केली आहे. आयुष्याची गाडी आपण मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. कोरोनाचे संकट वाढता वाढता वाढे अशी या कोरोनाची परिस्थिती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले.

आयुष्यात हे संकट हे कदाचित जगावरचे पहिले महाभयंकर संकट आहे त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले .

दोन दिवसांचे आपले अधिवेशन पार पडले आहे. या दोन दिवसात सर्वपक्षीयांनी चांगले सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका असेही आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत मास्क लावताना शिथीलता आलेली दिसते आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER