राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण

Maharashtra’s Chief Secretary Sanjay Kumar - Corona Positive

मुंबई : राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार (Sanjay Kumar) यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected chief secretary Maharashtra). काल (27 सप्टेंबर) रात्री मुख्य सचिवांचा कोरोना (Corona) रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

तुर्तास त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने सध्या ते कालपासूनच आपल्या निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. तसचे कालपासूनच आपल्या निवासस्थानातूनच कामकाज सुरू केले असून आपली तब्येत अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. मात्र सचिव कार्यालयात इतर कोणीही कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सांगण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER