दिवाळीत फटाक्यांवर बंदी ; युवक काँग्रेसची आदित्य ठाकरेंकडे मोठी मागणी

Aaditya Thackeray - Satyajeet Tambe

अहमदनगर :- इतर राज्यांप्रमाणे तसेच कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या काही घटकांचे नुकसान होणार असले तरी पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असे तांबे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यानंतर आता तांबे यांनी थेट बंदीचीच मागणी केली आहे. दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारांनी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

खरे पाहिले तर फटक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे. या व्यावसायात मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग अवलंबून आहे. त्यांनी या वर्षीही मोठ्या प्रमाणावर माल घेतला आहे. पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून आता थोडे नुकसान झाले तरी चालेले. मात्र, येणाऱ्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे, असे तांबे म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER