महाराष्ट्राने संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली.

दरम्यान 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button