‘दिल्लीला भिजवणाऱ्या पवारांच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेला महाराष्ट्र विसरणार नाही’

Pune: NCP President Sharad Pawar addresses in pouring rain at an

सातारा : २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी भाजपच्या (BJP) वाटेवर गेली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पडले. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभा निवडणूक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनीही विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे गड राखण्यासाठी स्वतः मैदानात उतरले. आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.

सातारा विधानसभा (Satara Vidhansabha) व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसची भरपावसात सांगता सभा झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण करून सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी विनंती केली. पवारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. पवारांची भरपावसातील ही सभा त्यावेळी देशभरात प्रचंड गाजली. सातारा पोटनिवडणूकच नव्हे, तर विधानसभेच्या निवडणुकीचाही ट्रेंड या सभेने बदलून टाकला, असेही मानले जाते. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज (१८ ऑक्टोबर) राष्ट्रवादीकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘दिल्लीला भिजवणाऱ्या पवारांच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेला महाराष्ट्र विसरणार नाही’, असं या व्हिडिओत सांगण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची आज वर्षपूर्ती, राज्याच्या राजकारणाला मिळाली कलाटणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER