आंध्रप्रदेशनंतर अधिवेशन संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात ‘दिशा कायदा’ लागू होणार!

Disha Act - Anil Deshmukh

मुंबई : महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हा कायदा पारित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले –
“विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.”


Web Title : Maharashtra will have its own disha law to fight against women related crime

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)