माणगाव परिषदेच्या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र शासन करणार

मुंबई : मौजे माणगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे दिनांक २१मार्च व २२मार्च २०२० रोजी होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांची माणगाव परिषद शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन बार्टी या शासनाच्या संस्थेकडून करण्याची मागणी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. मागणीनुसार मुंडे यांनी आज मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – धनंजय मुंडे

ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाराष्ट्र शासनाच्या बार्टी या संस्थेमार्फत केले जाईल असे घोषित केले व बार्टी या शासनाच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात ताबडतोब सूचना देऊन लेखी आदेश काढले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक समिती नेमून कार्यक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला जाईल व त्या खर्चाच्या रकमेची आर्थिक तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये केली जाईल असे मंत्री मुंडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यांचे मंत्री तसेच देशातील विविध राज्यातील मंत्री, केंद्रीय मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.