राज्यपालांना राज्य सरकारकडून विमानच उपलब्ध झाले नाही; नवा वाद पेटण्याची शक्यता

Bhagat Singh Koshyari-CM UddhavThackeray

मुंबई :- ठाकरे सरकार (Thackeray Govt) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील वादंग पुन्हा पेटला आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे कळले. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यात २ उपमुख्यमंत्री; नितीन राऊतांना पद देण्याचा प्रस्ताव !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER