
कणकवली : ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात विलीन झाला आहे . राणे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केलं.
कणकवलीत होणाऱ्या सभेत नारायण राणे यांच्यासह नितेश राणे, निलेश राणे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अधिकृतपणे भाजपाचे सदस्य होतील.
कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.
नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री ज्या कणकवलीत ही सभा घेणार आहेत, त्याच मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपाचे उमेदवार आहेत तर शिवसेनेनेदेखील आपला उमेदवार या मतदारसंघातून उभा केला आहे.
कणकवलीमधून सतिश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. सतिश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उद्या कणकवलीत सभा घेणार आहोत.
दरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असे वक्तव्य एका वृत्तवाहिनीला बोलताना नितेश राणे यांनी केले आहे. निवडणुकीतही भाजपाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या .