महाराष्ट्रात कडकडीत लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray - Lockdown

मुंबई : राज्यात कोरोनाचे सनकोट दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात (Maharashtra-strict-lockdown) असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर काल (20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असेल , अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

ही बातमी पण वाचा : लॉकडाऊनवरुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांसमोर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button