महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ बंद पडण्याच्या मार्गावर

Mahananda milk

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाला (महानंदा) ३२.६६ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. दूध विक्री ८ लाखांवरून ८५ हजार लिटरवर अली आहे. यार नागपूर, लातूर युनिट तोट्यात आहेत. संघाच्या दूध संकलन आणि विक्रीमध्ये कमालीची घट झालेली आहे. चालूवर्षी संस्थेला ३२ कोटी ६६ लाख रुपयांचा तोटा झाला असून नागपूर व लातूर युनिट तोट्यात गेले आहेत. संस्थेची वार्षिक उलाढालही ६०० कोटीवरून २०० कोटी रुपयांवर आली आहे.

महानंद ही राज्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील ८७जिल्हा व तालुका दूध उत्पादक सहकारी संस्था सभासद आहेत. संस्थेवर पहिल्यापासून काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. महानंदवर २००५-०६ साली पहिल्यांदा

सभासदनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर सलग पाच-सहा वर्षे म्हणजे २०११-१२ पर्यत संस्था वार्षिक दोन ते पाच कोटी रुपयांपर्यंत फायद्यात होती. दूध संकलन आणि विक्रीमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. त्या पटीत वार्षिक उलाढालही साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. दूध संकलन आणि विक्रीही प्रतिदिन सरासरी ७ ते ८ लाख लिटरच्या घरात जाऊन पोहोचली होती, सुध्या हाच आकड़ा केवळ ८५ देणेही अशक्य होणार आहे. संस्थेला हजार लिटरवर येऊन पोहोचला आहे. तसेच वार्षिक उलाढाल २०० कोटी रुपयांपर्यंत रोडावली आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर संस्थेच्या पूर्वाश्रमीच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी १० जानेवारी २०२० रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नूतन अध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजितसिंह देशमुख यांची २३ जानेवारी २०२० रोजी निवड करण्यात आली आहे. मात्र तेही महानंदला आर्थिक उभारी देऊ शकलेले नाहीत. सध्या महानंदच्या खात्यावर ३२ कोटी ६६ लाख ६३ हजार २०८ रुपयांचा संचित तोटा दिसून येतो आहे. महानंदच्या दृष्टिकोनातून ही बाब चिंताजनक स्वरूपाची समजली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER