राज्य बँक गैरव्यवहार; संचालक मंडळास क्लीन चीट

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (Maharashtra State Cooperative Bank) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बरखास्त करण्यात आलेल्या तत्कालीन संचालक मंडळाबाबत नेमलेल्या चौकशीत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. याबाबतचा बँकेच्या नुकसानीवर निवृत्त न्यायाधीश अहवाल गुरुवारी (दि. १८) सहकार आयुक्तालयात सादर करण्यात आला आहे. राज्य बँकेवरील तत्कालीन संचालक मंडळात सर्वपक्षीय बड्या राजकीय नेत्यांचा समावेश होता.

पंडितराव जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली होती. या समितीचा अहवाल सहकार आयुक्तालयात सादर करण्यात आल्याचे समजले.

घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्यासह बाळासाहेब सरनाईक (कोल्हापूर), उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, दिलीप सोपल, मधुकर चव्हाण (तुळजापूर), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ, शेकापचे जयंत पाटील (अलिबाग), राजवर्धन कदमबांडे, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, अमरसिंह पंडित, यशवंतराव गडाख, रजनी पाटील आदी नेते अडचणीत आले होते. मात्र कधी न्यायालयीन स्थगिती,कधी संचालकांचा तर कधी बँके चा अहसहकार यामुळे ही चौकशी रखडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER