कोरोना नियंत्रण साहित्य खरेदीसाठी सरकारने राखून ठेवले ६३४ कोटी

Covid care items

मुंबई : कोविडशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च २०२१ पर्यंत ६३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या खरेदी सूचीत २९५ कोटी रुपयांच्या ६० लाख रॅपिड अँटीजेन किट, २७.४ कोटी रुपयांच्या ३५ लाख एकेरी वापरल्या जाणार्‍या आरटी-पीसीआर किट, ५३.३ कोटी रुपयांच्या २.५ लाख रेमडिसिवीर इंजेक्शनच्या कुपी , २३ कोटींच्या फविपिरावीर, एन-९५ आणि २० कोटी रुपयांचे ट्रिपल लेयर मास्क अशी २.७ लाख पॅकेट्स आहेत .

ऑक्सिजनची संभाव्य कमतरता लक्षात घेऊन, राज्याने ४०,००० किलो-लिटर लिक्विड ऑक्सिजन रिफिल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यासाठी १०० कोटी रुपये बजेट दिले गेले आहे. ते १२ कोटी रुपयांमध्ये ४.८ लाख जंबो ऑक्सिजन रिफिल सिलिंडर खरेदी करू शकेल. सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी जारी केलेल्या सरकारच्या ठरावात म्हटले आहे की, प्रशासनाने या खर्चास मान्यता दिली असताना ही खरेदी राज्य सरकार तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER