महाराष्ट्र : लॉकडाऊन-५ ची नियमावली

- शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

Lockdown 5.0 -CM Uddhav Thackeray

मुंबई : लॉकडाऊन-५ मध्ये महाराष्ट्रात ३ जूनपासून काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जनजीवन खुले करण्यात येणार आहे. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम याला परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक मैदानेही खुली होणार आहेत. समुद्रकिनाऱ्यांवरही फिरता येईल. मात्र राज्यातील धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत आणि सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी असेल.

नवी नियमावली –

 • प्रतिबंधित क्षेत्र वगळता जनजीवन खुले होणार
 • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम याला परवानगी
 • सार्वजनिक मैदाने खुली होणार
 • समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
 • धार्मिक स्थळं बंदच राहणार
 • स्डेडियमही बंदच राहणार
 • फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश
 • लांबच्या प्रवासावर बंदी
 • शाळा, महाविद्यालये बंदच राहणार
 • मेट्रो बंदच

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रात सर्व बंद असेल अन्यत्र अनेक मुभा. टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे

पहिल्या टप्प्यात ‘या’ गोष्टींना परवानगी

३ जूनपासून पहिला टप्पा सुरू होईल. यात सायकलिंग, धावणे, चालणे या व्यायामांना परवानगी. पहाटे  ५ ते संध्याकाळी ७ खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्रकिनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायाम करता येईल. इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.

सामूहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते,

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान १५ टक्के कर्मचारी किंवा किमान १५ कर्मचारी (जे अधिक असेल ते) काम करतील.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ‘या’ गोष्टी शिथील होणार

 • दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार.
 • दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ एक दिवसआड उघडतील.

१. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, होणार नाही.
२. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी.
३. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळा.

४. टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + २ प्रवासी दुचाकी – केवळ चालक

 • ८ जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान १० टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.

नाईट कर्फ्यू :

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री ९ ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी. रात्री ९ ते सकाळी ५ यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू असेल.

६५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.

कोरोना रुग्णांची संख्येनुसार जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित करावेत. हा कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो.

Check PDF : महाराष्ट्र; लॉकडाऊन ५ ची नियमावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER