कोरोनाचे संकट कायम महाराष्ट्रात १८ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण, ३९२ मृत्यू

Coronavirus

मुंबई: राज्यात कोरोनाचे (Corona) संकट कायम आहेत . मागील २४ तासात १८ हजार ३९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये २० हजार २०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संख्येमुळे आत्तापर्यंत ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ७२ हजार ४१० अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ३९२ मृत्यू झाले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ३३ हजार ४०७ इतकी झाली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER