राज्यात कोरोनाचे थैमान; रुग्णांमध्ये ६,५५५ ची भर मुंबईत ६९ जणांचा मृत्यू

Maharashtra records

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यात एकट्या मुंबईतील रुग्णांची संख्या ८४ हजारांपेक्षा जास्त असून, आज दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली.

ही बातमी पण वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

“राज्यात आज ६५५५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या आता २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ३ हजार ६५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ११ हजार ७४० रुग्ण आतापर्यंत कोरोनातून बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८६ हजार ४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER