महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजार ७७२ इतकी

Coronavirus-Maharashtra

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे . महाराष्ट्रात (Maharashtra) २० हजार १३१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये कोरोनामुळे ३८० मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १३ हजार २३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजार ७७२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २७ हजार ४०७ मृत्यू झाले आहेत.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात २ लाख ४३ हजार ४४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER