महाराष्ट्रावर पुढील ४-५ दिवस अवकाळी पावसाचे सावट; हवामान विभागाचा इशारा

Heavy Rainfall

नवी दिल्ली : अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात सध्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र उकाडा जाणवत आहे. उन आणि कोरोनामुळे नागरिक त्रस्त झालेत. मात्र, अशात पावसाने हजेरी लावली, तर काही प्रमाणात उष्णता कमी होऊ शकते. शहरी भागातील नागरिकांना यामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. शेती आणि शेतमालावर अवकाळी पावसाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विशेषत: भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आधीच भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला विक्रेते अडचणीत आहेत. यात आणखी पावसाची भर पडली, तर त्यांच्या अडचणी दुपटीने वाढतील.

महाराष्ट्रभर पावसाची शक्यता
महाराष्ट्राबरोबर देशातील विविध राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक किंवा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील ५ दिवसांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि गोवा विभागातही पावसाच्या हजेरीची शक्यता आहे. त्याचबरोबर, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, सोबत कोरोनाचे संकट अशा कात्रीत सध्या सर्वसामान्य माणूस सापडला आहे.

शेतकऱ्यासमोर मोठे आव्हान
अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतीला फटका बसू शकतो. विशेषत: फळबागा, भाजीपाला यांचे नुकसान होऊ शकते. रब्बी पिकांचेही पावसामुळे नुकसान होऊ शकते. आधीच अडचणीत असणारा शेतकरी या पावसामुळे आणखी संकटात सापडू शकतो. काही ठिकाणी वादळी वारे आणि गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button