… त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत; शिवसेनेचे अमित शहांना उत्तर

मुंबई :- नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेवर टीका करताना भाजपाचे नेते व गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले होते की, आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर तुमचे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते.

यावर, शिवसेनेला संपवणाऱ्यांची महाराष्ट्राने वाट लावली, असे सुनावताना शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे की, शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली, असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो.

भाजपासोबत युती करून विधानसभेची निवडणूक लढल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्याबद्दल शिवसेनेवर टीका करताना शहा म्हणाले होते की, जनादेशाचा अपमान करून तीन चाकांचे सरकार राज्यात आले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER