लसीकरणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

Coronavirus Vaccination - Maharashtra

नवी दिल्ली :- लसीकरण (Vaccination) अभियानात आतापर्यंत देशातील ७४ लाखांहून अधिक कोरोना (Corona) योद्ध्यांना लसीकरण केले आहे. लसीकरण अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख ८ हजार ५७३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या ८.१ टक्के एवढे आहे.

लसीकरणात पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७ लाख ६३ हजार ४२१ आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण केले आहे. या राज्यांपाठोपाठ गुजरात ६,४५,४३९ (८.६ टक्के), राजस्थान ५,९०,९९० (७.९ टक्के), मध्य प्रदेश ४, ८७,२७१ (६.५ टक्के), कर्नाटक ४,७७,००५ (६.४ टक्के), प. बंगाल ४,५३,३०३ (६ टक्के), बिहार ४,४८,९०३ (६ टक्के), ओडिशा ३,८३,०२३ (५.१ टक्के) तसेच आंध्र प्रदेशात ३,४३,८१३ (४.६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER