महाराष्ट्र लोकसेवा आयोग : ‘एमपीएससी’च्या परीक्षा पुढे ढकलल्या

MPSC Exam Postponed

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा- २०२० पुढे ढकलल्यानंतर आता आयोगाने अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा- २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा- २०२० पुढे ढकलल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण (SEBC Reservation) रद्द झाले. त्यामुळे राज्यातील विविध मराठा समाजाच्या संघटनांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत एमपीएसच्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा- २०२० पुढे ढकलण्यात आली.

मात्र, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत काहीही कळले नव्हते. मंगळवारी आयोगाने परिपत्रकाद्वारे १ नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आणि २२ नोव्हेंबर रोजी होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER