… तेव्हा शरद पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी

Nawab Malik

मुंबई :- महाराष्ट्रासाठी ईडीचा (ED) खेळ हा नवा नाही. भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जाते. या माध्यमातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ‘ईडी’कडून पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे . तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ही नोटीस मागे का घेतली, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपला सत्ता मिळेत, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असे मलिक यांनी म्हटले.

भाजपाकडून प्रत्येक राज्यात दबावतंत्र वापरले जात आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना पैसे दिले जात नाहीत. राज्यातील प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले जातात. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’सोबत काय झाले ते पहा. बिहारच्या निवडणुकांसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात आले. भाजपाने त्यासाठी सीबीआयचा कशाप्रकारे वापर केला, हे देशाला माहिती आहे, असे म्हणत मलिक यांनी मोदी सरकार व भाजपावर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष? पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER