
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही ईडीने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे. लागोपाठ आलेल्या ईडीच्या नोटिसांमुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे .
शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनावरून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणीधुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?- असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे..
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
महाराष्ट्र धर्म?— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला