उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेनेचे 15 आमदार देणार फडणवीस सरकारला साथ?

BJP-SHIVSENA

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या भीतीनं त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मात्र तरीदेखील शिवसेनेचे 15 ते 20 आमदार देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचं समोर आलं आहे.

आपल्या पक्षातून फुटून भाजपकडे जावू नयेत यासाठी शिवसेनेकडून संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच केले हे महत्त्वाचे काम

भाजपकडून आमदार पळवण्याचा डाव उलथवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी आमदारांना प्रश्न विचारला इतकं सगळं झाल्यानंतरही भाजपला कोण पाठिंबा देण्यासाठी इच्छुक आहे? त्याबाबत आमदारांमध्ये संभ्रम असल्याचं लक्षात येताच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आमदारांसोबत रात्री हॉटेल ललितमध्ये थांबले होते.