महाराष्ट्राला २६ हजार ९५९ कोटी मिळणे बाकी; उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर मांडला हिशेब

Uddhav Thackeray - PM Modi - Maharshtra Today

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिष्टमंळात समावेश होता. शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाच्या मुख्य मुद्द्याशिवाय इतरही मुद्दे मांडले.

जीएसटी परतावा म्हणून २४,३०६ कोटी आणि शहरी स्थानिक विकास निधी म्हणून परफॉर्मन्स ग्रॅण्ट स्वरूपात मिळणारे हे १४४४.८४ कोटी रुपयांचे अनुदान आणि पंचायत राज संस्थांसाठी १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर करण्यात आलेला १२०८.७२ कोटींचा निधी तातडीने देण्यासंदर्भातील मागणी केली. एकूण २६ हजार ९५९ कोटी ५६ लाख रुपयांचा महाराष्ट्राचा निधी केंद्राकडून येणे बाकी असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

ही बातमी पण वाचा : सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही ; उद्धव ठाकरेंचे मोदींच्या भेटीनंतर वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button