महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनकडे; राज्य सरकारकडून ‘वर्क फ्रॉम होम’साठी चाचपणी

Work From Home - Maharastra Today
Work From Home - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्राची दुसऱ्या लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, मागच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याने लॉकडाऊनला लोक विरोध करत आहेत. त्यामुळे सरकार इतर पर्यायांचा विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना असे आदेश देण्याची शक्यता आहे. नागरिक घरी राहिल्यानं रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असा सरकारचा विचार आहे. आयटी सेक्टर व इतर ऑफिसेसला सरकार वर्क फ्रॉम होमसाठी आदेश देणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावले आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल.

राज्यातील लोक १५ दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वांत शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशाराही राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button