मुख्यमंत्री सहायता निधीला महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमकडून ७ लाखांची मदत

Maharashtra Officers Forum donates Rs 7 lakh to CM Assistance Fund

नागपूर :- मागील तीन महिन्यापासून कोरोना विषाणूंशी महाराष्ट्र सरकार लढा देत आहे. कोरोनामुळे अनेक देश गंभीर संकटात सापडले आहेत. यात महाराष्‍ट्र सरकारलादेखील अनेक आरोग्य सांधनांची व साहित्यांची गरज भासत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास हजारो नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे.

आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमने ७ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शुक्रवारी उर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सपूर्द केला. महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमने समाजिक दायित्वाच्या भूमिकेतून कार्य केले आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमचे पदाधिकारी सचिव शिवदास वासे, उपाध्यक्ष टी. बी. देवतळे, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय सचिव अशोक गेडाम, प्राचार्य सच्चिदानंद दारूंडे, जिल्हा सचिव धर्मेश फुसाटे व ऊर्जा मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी ललीत खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER