लव्ह जिहादची प्रकरणे वाढतायेत ; राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख राज्यपालांना भेटल्या

Rekha Sharma-Maharashtra Governor

मुंबई :  राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat singh Koshyari) यांची भेट घेतली आणि “लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांसह” राज्यातील महिलांशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

शर्मा यांनी राज्यपालांना सांगितले की, राज्यात ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि आयोगाच्या एका रिपोर्टनुसार शर्मा यांनी दावा केला की, महाराष्ट्रात लव जिहादच्या प्रकरणांची वाढ होत असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच, राज्य महिला आयोगाला पुर्ण वेळच्या महिला अध्यक्षाची गरज असल्याचेही त्यांनी नमुद केले.

त्यांनी आपली सहमतीतून आंतरधर्मीय लोकांचे विवाह आणि लव जिहाद मधील अंतर यावर भाष्य केले. या विषयाकडे राज्यपालांचे लक्ष केंद्रित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

तसेच, लव जिहाद शब्दांचा उपयोग काही दक्षिणपंथी टिप्पणीकार करत असतात आणि आरोप लावतात की, हिंदु महिलांना फुस लावून त्यांचे धर्मांतर करून लग्न केले जाते. या गोष्टींकडेही रेखा यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले.

दरम्यान, राज्य महिला आयोगाला पुर्ण वेळेसाठी कोणी अध्यक्ष नसल्याने राज्यात जवळपास 4000 तक्रारी अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचेही रेखा यांनी राज्यपलांना सांगितले.

दरम्यान, रेखा म्हणाल्या की, आंध्र पदेशच्या दर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायद्यासारखा एक कायदा असणे आवश्यक आहे. ज्यामुळे महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल असा विश्वास रेखा यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER