सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेचं ‘पेंग्विन गेम्स’ लाँच

MNS New Flag

मुंबई : सध्या वेबसीरिजचा जमाना आहे. त्यातच वेब सीरिजद्वारे अनेक विषय सर्वांसमोर मांडण्याचे प्रयत्न केले जातात. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) एक नवी वेब सीरिज लाँच केली आहे. ‘पेंग्विन गेम्स’ या नावाखाली त्यांनी एका वेब सीरिजला सुरूवात केली आहे. या वेब सीरिजद्वारे मनसेनंवरळीतील सामान्य नागरिकांना ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

“फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्ष हे केवळ वरवरच्या मुद्द्यांवरच लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे,” असं मत मनसेचे संतोष धुरी यांनी व्यक्त केलं. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एकीकडे शिवसेनेकडून (Shiv Sena) वरळीमध्ये A+ कॅम्पेन चालवलं जात आहे. स्ट्रीट आर्ट, एलईडी सिग्नल, रस्त्यांचं सौदर्यीकरण अशा काही गोष्टी या ठिकाणी राबवल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी पेंग्विन गेम्स ही वेब सीरिज सुरू केली आहे. “दर पंधरा दिवसांनी या वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याचं प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाईल. प्रेम नगरच्या रहिवाशांकडून आम्हाला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. शौचलांना दरवाजे नसणं, पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत,” असं धुरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER