अजित पवार यांना कोरोना झाल्याचे माध्यमांचे वृत्त खोटे : पार्थ पवार

Ajit Pawar & Parth Pawar

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. मात्र हे वृत्त खोटं असल्याची माहिती पार्थ पवार (Parth Pawar) यांनी दिली.

अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता; मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप अजित पवारांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता ते नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक  : एकनाथ खडसे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER