ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक, संजय राठोड ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) संशयाच्या भोवर्‍यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राठोड 3 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून ते नॉट रिचेबल आहेत. मुंबईतील घरातही ते नसल्याची माहिती आहे. त्यातच संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चाही फेर धरत आहेत. परंतु सरकारकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आले आहे. राठोड अद्याप प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत, किंवा त्यांनी कुठल्याही माध्यमातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे ते थेट मंत्रालयात येऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER